दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान


छत्रपती शिवाजी महाराज !

अनुक्रमणिका


प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !
 


संकलक
कु. दीप्‍ती मुळये,
रत्‍नागिरी

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !


शिवोत्सवाचा उद्देश
१९२८ साली मुंबईच्या `श्रद्धानंद' या साप्‍ताहिकामध्ये स्वा. सावरकरांचा `शिवोत्सव' हा लेख प्रसिद्ध झाला. त्यातील काही तेजस्वी परिच्छेद तर प्रत्येक हिंदूंने मुखोद्‌गत करायला हवेत. स्वा. सावरकर लिहितात, `सोळाव्या शतकात, जवळजवळ मरणदशेला पोचलेल्या हिंददेशाच्या पुनरुद्धाराचं प्रचंड कार्य, श्रीशिवप्रभूनं सतराव्या शतकारंभी हाती धरलं. जेथे राणा संग नि महाराणा प्रतापसिंह हे यशस्वी होऊ शकले नाहीत, ते कार्य एका तरुणानं पांच-पंचवीस मावळयांच्या साहाय्यानं सिद्ध केलं; आणि रायगडाच्या कोरड्या पठारावर मोहोरा-माणकांचा पाऊस पाडून रत्‍नखचित सुवर्ण सिंहासन उभं केलं ! परंतु हिंदूंनो, म्हणून असं मानू नका, की `फू:' करून उडवलेल्या चेटुकाच्या मातीफुंकीनं हे घडून आलं ! हे घडून आणायला भगीरथाप्रमाणं खडतर प्रयत्‍न करावे लागले. प्राणपणाची तपश्चर्या ज्या वेळी प्रभू शिवरायांनी केली, नि त्या वेळच्या पिढीस करायला लावली, तेव्हाच सर्व हिंदुस्थान व्यापून उरलेलं हिंदुसंस्कृतीचं भयाण मरणसंकट निवारता आलं ! हे हिंदुजाती, तू तर शिवाजीरायांचा हा उत्सव जाती-कर्तव्य, राष्ट्रकर्तव्य नि धर्मकर्तव्य म्हणून पाळला पाहिजे; कारण, तू आज जी आहेस, ती हा तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून आहेस. या बापास आठव, आळव आणि प्रार्थना कर की, शिवप्रभो, आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्याची स्फूर्ती दे! आणि महाराष्ट्रा ! तू तर हा उत्सव प्राणांचे झोले करून नि त्यावरून शिवरायांच्या मिरवणुका काढून साजरा कर. तुझी सर्व बुद्धी नि तुझी सर्व शक्‍ती त्यांच्यापुढे तांबूलतूल्य अर्पून तू हा उत्सव साजरा कर; त्यांना तुझ्या रक्‍ताचा नैवेद्य दाखवून साजरा कर. आणि - तरुणांनो ! शिवरायांचा हा उत्सव नगरोनगरी व घरोघरी साजरा करीत- करीत हा महामंत्र म्हणा की, हे शिवप्रभो ! आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्यास स्फूर्ती दे ! क्षणाक्षणांचा व्यय नि कणाकणांचा त्याग या मातृभूमीच्या स्थंडिलावर करा. सतत नियतकुशल कर्माचरणाने हे कर्तव्य-स्थंडिल धगधग पेटू द्या; नि प्रसंगच आला, तर शेवटची आहुती, शेवटचा महाभोग या साडेतीन हात देहाचा देऊन, तुम्ही ती विजया-देवी हिंदुभूमीच्या अभ्युदयाकरिता हस्तगत करा. आज जर तुम्ही हे असे प्रत्यक्ष कृतीचे तोरणागड-सिंहगड उभे केलेत, तर निश्चित समजा, की तो विजयाचा रायगड अखेर याच पिढीत, `याच देही, याच डोळा' भूमातेच्या पायी लोळण घेईल !'

शिवोत्सवामागील उद्देश व तळमळ महाराष्ट्र विसरला ?

ज्या तळमळीने व उद्देशाने स्वा. सावरकरांनी शिवोत्सव करायला सांगितला आहे, ती तळमळ, तो उद्देश आज महाराष्ट्रातच विसरला गेला आहे कि काय, अशी शंका येते. जगात कोणताही देश आपल्या राष्ट्रपुरुषाच्या जन्मदिनांकाचा घोळ घालत नाही. येथे तर हिंदुराष्ट्राच्या जनकाचाच प्रश्‍न आहे, की ज्याच्यामुळे सुंता होण्यापासून हिंदू वाचले. परकियांचे (उदा. व्हॅलेंटाईन) दिवस आठवणीने साजरे करणार्‍या हिंदूंना मात्र स्वत:च्या अर्वाचीन युगपुरुषाचा जन्मदिवस नेमका माहीत नाही, हा दैवदुर्विलासच नव्हे काय ? मूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही ? यामुळे नकळत हिंदू समाज दुभंगला जातो, याची जाणीव कोणालाच कशी होत नाही ? श्रीराम-श्रीकृष्ण यांच्यापासून सर्व युगपुरुषांचा इतिहास नक्षत्र-मितीवर जतन करणार्‍या हिंदूंना हे लांछनास्पद आहे !

धर्मांधाना छ. शिवाजी महाराज डोळ्यांसमोर नको !
स्वा. सावरकर हिंदूजातीला सांगताहेत, `तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून तू आहेस, या बापाला तू आठव.' हिंदूंनी मात्र शिवजयंतीपुरतीच त्यांची आठवण काढायचे ठरवले आहे. महाराष्ट्रातला हिंदू छ. शिवाजी महाराजांचे चरित्र व पराक्रम विसरतोय; पण येथील मुसलमान मात्र महाराजांना एका वेगळया अर्थाने विसरत नाही. डिसेंबर २००७ मध्ये सातारा जिल्ह्यातील खर्शी-बारामुळे या गावातील जमीर मोमीन या माध्यमिक शिक्षकाने महाराजांचे आक्षेपार्ह चित्र भिंतीवर रेखाटले ! महाराष्ट्रातलाच जमीर मोमीन महाराजांचा द्वेष करतोय, असे नव्हे, तर तिकडे दूरवरील म्हणजे केरळमधील मुसलमानही महाराजांचे चित्रच डोळयांसमोर नकोय, असे म्हणतोय. जून २००७ मध्ये मंजेश्‍वर (केरळ) या गावातील एका शाळेत महाराजांचे चित्र व त्याखाली त्यांचा पराक्रम सांगणार्‍या चार ओळी असणार्‍या `सनातन वह्या' वितरीत करण्यात आल्या. या वह्यांमुळे `आपल्या धार्मिक भावना दुखावल्या' अशी तक्रार अबूबक्कर सिद्दीकी या स्थानिक मुसलमानाने पोलिसांकडे केली व वह्यांचे वाटप करणारे धर्माभिमानी श्री. सुरेश भट यांना अटक करवली ! महाराजांचे चरित्र कसे वाचावे, हे कळण्यासाठी या लेखात वर स्वा. सावरकर व पुढे पु.भा. भावे व लो. टिळक यांच्या मतांचा उल्लेख केला आहे. महाराजांच्या चरित्रातून हल्ली वेगवेगळे अर्थ राजकारणाच्या सोयीसाठी काढले जातात. याचे एक उदाहरण पाहूया. मार्गशीर्ष शुद्ध सप्‍तमी या दिवशी महाराजांनी अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवले. १६ डिसेंबर २००७ रोजी हा `शिवप्रतापदिन' प्रतापगडावर साजरा करण्यात आला. प्रतापगड उत्सव समितीला प्रतिबंध करून शासनाच्या पाठिंब्यावर हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या भाषणात मुस्लीम लीग फ्रंटचे प्रवक्‍ते ताहीर शेख म्हणाले, ``महाराजांनी अफझलखानाला मुस्लीम म्हणून नव्हे, तर राजकीय विरोधक म्हणून मारले.''(म.टा. १७.१२.२००७) ताहीर शेख यांनी केलेला शब्दांचा खेळ शासनाने जमवलेल्या श्रोत्यांच्या लक्षात आला नसेल; पण आपल्या लक्षात आला पाहिजे. अफझलखानाला महाराजांचा `राजकीय विरोधक' संबोधून खानाच्या दुष्कृत्यांवर शेख यांनी पांघरूण घातले आहे, तर दुसर्‍या बाजूला आपल्या राजकीय विरोधकाला संपवणार्‍या महाराजांना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या `खुनी' म्हटले आहे. अफझलखान महाराजांचा राजकीय विरोधक होता, तर त्याने हिंदूंचे पंढरपूर व तुळजाभवानीचे देऊळ का फोडले, याचे उत्तर ताहीर शेख देणार आहेत का ? अफझलखानाच्या पोटात वाघनखं खुपसून महाराजांनी त्याचा `विश्‍वासघात' केला, अशी गांधीगिरी बर्‍याच वर्षांपासून केली जाते. अशा षंढगिरीवर हिंदुत्ववादी लेखक भाषाप्रभू पु.भा. भावे तुटून पडत. भावे म्हणत, ``शत्रूचा विश्‍वासघातच करायचा असतो, महाराजांकडची वाघनखं काही खानाची पाठ खाजवण्यासाठी त्यांनी सोबत घेतली नव्हती आणि खानानेही त्याची कट्यार महाराजांना भेटीत सफरचंद कापून देण्यासाठी आणलेली नव्हती !' भावे पुढे म्हणत,``पहिला वार हा नेहमी शिवाजीचाच हवा!'' आजचे राज्यकर्ते पहिला नव्हे, दुसरा नव्हे, तर शत्रूचे शंभर वारही मुकाट्याने सहन करत जनतेलाच शांतीचे पाठ देत रहातात !

महाराजांनी `इस्लाम'चेही आक्रमण रोखले !
महाराजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नुसते `मुसलमानां'चे आक्रमण परतवले एवढेच नव्हे, तर `इस्लाम'चेही आक्रमण रोखले. महाराजांच्या जन्मापूर्वी मुसलमान सत्ताधीशांकडून हिंदु जनता कशी भरडली व चिरडली जात होती, याचे हृदयद्रावक वर्णन समर्थ रामदासस्वामींनी केले आहे. मुसलमान आक्रमकांची टोळधाड आल्यावर जे पुरुष घरातून पळून जात, ते घरी परतल्यावर लक्षात येई की, सुलतानाचे लोक कुटुंबातील तरुण मुलगी घेऊन गेले आहेत. अनेक हिंदु कन्यकांची पाठवणी नंतर अरबस्तानात होत असे. मुसलमानांचे आक्रमण आले की, देवांच्या मूर्तीही विहिरीत वा तळयात लपवून ठेवाव्या लागत. याचे वर्णन करतांना `येक देव पाताळी बुडविला' असे समर्थांनी म्हटले आहे. ज्या हिंदूंना आपल्या देवमूर्तीची अशी काळजी घेणे शक्य होत नसे, त्यांच्या वाट्याला `येक देव फोडिला बळे' किंवा `येक देव घातला पायतळी' हे पहाण्याचे दुर्भाग्य येत असे ! समर्थांचे हे शल्य महाराजांनी जाणले. हिंदु धर्माचा आणि हिंदु राष्ट्राचा रक्षणकर्ता कोणीच न उरल्याने ही परिस्थिती आली आहे, हे ओळखून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली.

हिंदु धर्मरक्षक छ. शिवाजी महाराज !
एखाद्या महाकाव्याच्या नायकाप्रमाणे छ शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याने हिंदू समाजाला महान राष्ट्रीय प्रेरणा दिली. शेकडो वर्षांचे मुसलमानांचे अत्याचार व गुलामगिरी यांमुळे आपली अस्मिता, धर्मविचार, धर्माचरण विसरून गेलेल्या हिंदूंना महाराजांनी निर्भय बनवले ! हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी तेराव्या वर्षापासून पुढे सदतीस वर्षे म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत आजाराचे दिवस वगळता महाराजांनी कधीही विश्रांती घेतली नाही. हिंदु धर्मशास्त्रानुसार राज्याभिषेक करून घेऊन महाराजांनी हिंदूंना `सनाथ' केले आणि एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची मुहूर्तमेढ रोवली ! आज हिंदुस्थानातच `अनाथ' झालेल्या हिंदूंसाठी शिवचरित्र ही एक जयगाथा आहे. तिचे गायन व अनुकरण केले की, हिंदू पुन्हा `सनाथ' होतील !!

निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।।
मऱ्हाष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकरिता ।।
कितेक दुष्ट संव्हारिला । कितेकांसी धाक सुटला ।।
कितेकांसी आश्रयो जाला । शिवकल्याण राजा ।।
- समर्थ रामदासस्वामी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन !

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला...


प.पू. डॉ. आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला नाचत-गात त्यांची मिरवणूक काढणार्‍यांना त्यांचे महत्त्व कधीच कळणार नाही. त्यांच्यासारखे प्रयत्‍न करणार्‍यालाच त्यांची महती कळून तो त्यांच्या चरणी नतमस्तक होईल ! - प.पू. डॉ. आठवले




 

महाराष्ट्रातील लष्करी परंपरेचे आद्य प्रवर्तक : छत्रपति श्री शिवराय

संकलक : कु. रूपाली जोशी, रत्‍नागिरी १९.२.२००४ रोजी छ. शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू.


अपूर्व योजकता, समयज्ञता आणि कौशल्य
छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लष्करी परंपरेचे आद्य प्रवर्तक होते. दूरवेधक शस्त्रे, सुटसुटीत वेष, चपल सैन्यरचना योजून या प्रत्येक प्रकरणी यवनी सैन्यापेक्षा आपले सैन्य शिवरायांनी अधिक समर्थ केले, तसेच युद्ध करण्याची नवी पद्धति त्यांनी अंगिकारली. ही पद्धति म्हणजे मराठ्यांची प्रसिद्ध `गनिमी काव्या'ची पद्धत, `वृकयुद्ध' होय. शत्रूची असावध आघाडी मारावी, ती सावध होताच तेथून निसटून त्याच्या पिछाडीस दत्त म्हणून उभे रहावे आणि तीही मारून शत्रूची यथेच्छ लूट मिळवून आपापल्या गडकोटात निघून जावे. अशी ही गनिमी काव्याची पद्धत शिवाजी महाराजांनी त्या वेळच्या युद्धकलेत प्रचलित केली. त्या वेळच्या युद्धशास्त्रामध्ये त्यांचे अपूर्व योजकता, अपूर्व कौशल्य आणि अपूर्व समयसूचकता दिसून येते. भूमीवरच्या सैन्याची नवीन थाटाची उभारणी करून शिवाजी महाराजांची कुशाग्र बुद्धि थांबली नाही, तर त्यांनी त्या वेळपर्यंत कोणाही मुसलमान राजाने लक्षात न घेतलेली एक नवीन शक्‍ति निर्माण केली आणि ही शक्‍ति म्हणजे सिंधु-सैन्य. केवळ दहा-पंधरा वर्षांच्या अवधीत एक व्यवस्थित अत्यंत धाडसी व पाश्चात्त्यांच्याही नौकादलास आणि त्यांच्या चाचेगिरीस धाक वाटावा असे नौकादल त्यांनी निर्माण केले.


राजनीतिनिपुण
वीरामध्ये क्वचित् सापडणारे राजनीतिनिपुणत्व छत्रपति शिवरायांमध्ये विपुलपणे भरलेले होते. परशत्रूशी झगडा चाललेला असतांना केव्हा पड खावी, केव्हा उठाव करावा, हे जाणण्यास कमीतकमी हानीचा आणि जास्तीतजास्त लाभाचा मार्ग शोधून काढण्यास, त्याचप्रमाणे निष्कारण शौर्याचे प्रदर्शन न करता अवश्य तेव्हाच त्याचे अविष्कार करण्यास मुत्सद्देगिरी अंगी लागते. कपटाने घात करणार्‍या अफझलखानाला आधीपासूनच सावधानता ठेवून त्याचे कपट उघडकीस येताच बेधडकपणे मारणे काय किंवा जयसिंगासारखा उदारहृदय रजपूत राजा मुसलमानांच्या वतीने हिंदु रक्‍त सांडण्यास आला असता त्याच्याशी मानपान गुंडाळून ठेवून आणि सुरक्षिततेचे एकही साधन हाती न ठेवता पूर्ण विश्‍वासाने त्याच्या स्वाधीन होणे, हे सर्व डावपेचही छत्रपति शिवारायांनी लढवले.

कुशल युद्धनीति
शत्रूपक्षाच्या हालचालींची आगाऊ बातमी काढणे, अनपेक्षित आक्रमण करून शत्रूचा पराभव करणे, आदिलशाहीकडून फार मोठी स्वारी होण्यापूर्वी पडती बाजू घेऊन तह करणे, तह करतांना काही प्रदेश सोडून देणे, काही पचवणे व तहातूनही राज्य वाढवणे, असे एखाद्या मुत्सद्यालाही लाजवतील, असे प्रयत्‍न अठरा वर्षांच्या छत्रपति शिवरायांनी केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांची मनोभूमिका व वागणे पाहिले, म्हणजे अर्थशास्त्रात कौटिल्याने कल्पिलेला राजा कौटिल्यानंतर दोन हजार वर्षांनी साकार झाला आहे, असे वाटू लागते. कौटिल्याच्या कल्पनेतील हेरगिरीवर भर देणारा, आक्रमणाचे लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेणारा, प्रजारक्षणासाठी सदैव दक्ष, आवश्यक तर घातपात करणारा, पण विलासशून्य, उपभोगशून्य, न्यायी, धर्मश्रद्ध हे सर्व गुण छत्रपति शिवाजी महाराजांकडे होते.

रायगडावर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून हिंदुश्रीचा स्वातंत्र्यध्वज उभारणार्‍या गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराजांना शतश: प्रणाम !


छ. शिवरायांचे राज्य निधर्मी नव्हे, तर धर्मराज्यच होते !
 


छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक

भाषाप्रभु कै. पु.भा. भावे यांच्या लेखातील हा संपादित भाग !


छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना केली. हिंदवी राज्य म्हणजे हिंदूंचे राज्य. भावी पिढ्यांचा उगाच अपसमज होऊ नये, म्हणून ही हिंदूंच्या अधिराज्याची कल्पना छत्रपतींनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितली आहे. बखरकारांनी व इतिहासकारांनी तिचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे; तरी शेवटी व्हायचे ते झालेच ! (मंदबुद्धी किंवा अप्रामाणिक माणसांशी गाठ पडली की असेच होत असते.) शिवराज्याचे वर्णन अनेक आधुनिक पंडित `निधर्मी राज्य' म्हणून करू लागले. ते राज्य सगळयांचे होते, त्या राज्यात सर्व धर्मांना समान स्थान होते, असे ते अट्टाहासाने ओरडू लागले. आजच्या राज्यकर्त्यांच्या व स्वत:च्या मतांचा ते शिवराज्यावर आरोप करू लागले. महाराजांचे राज्य हे `हिंदवी' होते, हिंदंूचे होते, हे मान्य करतांना त्यांना संकोच वाटू लागला. तो काळ व त्या काळातील बलवत्तर धार्मिक प्रेरणांचा विसर पडल्याचे ढोंग ही मंडळी करू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूंचे राज्य असण्यात व तसे म्हणण्यात जणू काही छत्रपतींना व त्यांच्या सर्व सहकारी हिंदूंना फारच कमीपणा येतो, अशी या दीडशहाण्यांची कल्पना !

हिंदूंच्या सेवेमुळे तुर्क-मोगलांचा धर्म वाढला !
छत्रपतींचे राज्य `सगळयांचे' का ? तर त्या राज्यात धर्मवेड्या मोगलांच्या पावलावर पाऊल टाकून अहिंदु म्लेंछांच्या सर्रास कत्तली झाल्या नाहीत, अन्य धर्मियांची घरे-दारे त्या हिंदवी स्वराज्यात कोणी खणून काढली नाहीत किंवा पेटवून दिली नाहीत, परधर्मियांच्या स्त्रियांवर त्या राज्यात बलात्कार घडले नाहीत किंवा त्यांचे अपहरण झाले नाही, म्लेंछही त्या राज्यात सुखाने जगू शकले. छत्रपतींच्या सैन्यात काही मुसलमान सैनिकदेखील होते. तसेच पुसाल तर औरंगजेबाच्या सैन्यात काय हिंदु सैनिक नव्हते कि सेनापती नव्हते ? मिर्झाराजा जयसिंग कोण होता ? जसवंतसिंग कोण होता ? उदयभानू कोण होता ? आणि पुढे बाटून मुसलमान झालेला (आणि छत्रपतींनी नंतर पुन्हा शुद्ध करून घेतलेला) नेताजी पालकर तरी मूळचा कोण होता ? त्याला काय औरंगजेबाने आपल्या सेवेत घेतले नाही ? आणि त्याच्यासारख्या स्वदेशद्रोही व स्वजनद्रोही हिंदूंना औरंगजेबाने आपल्या चाकरीस जुंपले म्हणून काय तो मोठा निधर्मात्मा ठरतो ? त्याचे छळवादी, असहिष्णू आणि रक्‍तपाती राज्य काय न्यायाधिष्ठित निधर्मी राज्य ठरते ? तसेच पुसाल तर अगदी महंमद बिन कासीमच्या सिंधवरील पहिल्या स्वारीपासून या देशातील नामुस्लिम त्या परकीय आक्रमकांना साहाय्यभूत झालेले आहेत. त्यांना त्या आतंकवाद्यांनी परितोषिके दिली आहेत, पैसा वाटला आहे, चाकरीत घेतले आहे; परंतु त्याचा अंतिम परिणाम काय झाला ? इथे राज्य कोणाचे झाले ? साम्राज्य कोणाचे पसरले ? सिंहासनावर कोण बसले ? सत्ता कोणाच्या हाती आली ? आणि त्या सत्ताधार्‍यांचा धर्म कोणता होता ? ते सिंहासनावर बसले, त्याच क्षणी त्यांचा धर्मही सिंहासनावर बसला नाही काय ? त्यामुळे तो सत्ताधीश धर्म हा सत्ताधिशांचा धर्म ठरला नाही काय ? त्या सत्तेमुळे त्या धर्माला अधिक बळकटी आली नाही काय ? त्याचा वेगाने प्रसार झाला नाही काय ? एखादा धर्म जेव्हा सत्ताधिशांचा धर्म असतो, तेव्हा त्याला काहीएक किमान यश व गौरव आपोआप प्राप्‍त होतो. असा गौरव व यश सम्राट अशोकामुळे बुद्धपंथाला प्राप्‍त झाले. तशात त्या सत्ताधिशाने औरंगजेबाप्रमाणे स्वधर्मप्रसाराचे कंकणच बांधले, म्हणजे मग बोलायलाच नको ! औरंगजेब, शहाजहान व जहांगीर या तिघांनीही हिंदु मंदिरांचा भयानक उच्छेद केला आहे. जहांगिराचा तर मानसिंग हा मामाच होता. तो हिंदु होता; पण मोघलांच्या सेवेत होता. पण त्याच्या सेवाभावामुळे राज्य कुणाचे वाढले ? सत्ता कुणाची बळकट झाली ? धर्म कोणाचा वणव्याप्रमाणे पसरला ? म्हणजे या शूर रजपूतांनी अगदी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे राज्य, सत्ता व धर्म तुर्क- मोघलांचा वाढवला. त्यासाठी त्या तुर्क-मोगलांनी नामुस्लिमांची सेवा स्वीकारली होती. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी या हिंदूंना राबवले होते. या सेवक हिंदूंच्या साक्षीनेच काशीविश्‍वनाथाचे, केशवस्वामीचे, सोमनाथाचे व महांकाळाचे मंदिर उद्ध्वस्त झाले. ही मंदिरे ते बापडे तुर्कांचे सेवक वाचवू शकले नाहीत. नालंदा व विक्रमशिलेची विख्यात विद्यापिठे व तेथील अमूल्य ग्रंथभांडारे बखत्यार खिलजीने जाळून पोळून नष्ट केली. तेथील मुंडन केलेल्या बुद्ध अध्यापकांची त्याने सर्रास मुंडकी मारली. कुठलाही नामुस्लिम सेवक त्या प्रलयकाळी त्यांना वाचवू शकला नाही, वाचवण्यास धजावला नाही. याचा प्रत्यक्षात अर्थ काय झाला ? आपली सत्ता व धर्म वाढवण्यासाठी स्वत:ची संख्या व बळ कमी पडेल, म्हणून लाचार अन्य धर्मियांचा उपयोग करून घेणारे ते सारे आक्रमक मारेकरी मोठे उदार निधर्मीवादी होते, असा याचा अर्थ झाला काय ?

इंग्रजांचे राज्य कोणी चालवले ?

इंग्रजांच्या सेवेतही लक्षावधी अन्य धर्मीय होते. हिंदू होते व मुसलमानही होते. आपण किती उत्कृष्ट निधर्मीवादी आहोत, हे सिद्ध करण्यासाठी का इंग्रजांनी या गोरेतरांना आपल्या चाकरीत घेतले ? कि हा अफाट देश जिंकायचा व त्यावर राज्य करावयाचे तर ते केवळ मूठभर इंग्रजांच्या आवाक्यातले नाही, त्यासाठी बोटचेप्या अन्य धर्मियांचे साहाय्य आवश्यकच आहे, या निरुपायाच्या हिशोबाने त्यांनी हिंदू-मुसलमानांना चाकर्‍या दिल्या ? अर्थात काळया माणसाला त्यांनी कधी हिंदुस्थानचा सरसेनापती किंवा प्रमुख क्षत्रप (गव्हर्नर जनरल) केलेच नाही; परंतु कारकून, बुटनेर सैनिक यांसारखे कनिष्ठ सेवक त्यांनी लाखांनी चाकरीस लावले, परंतु या चाकरीमुळे राज्य कोणाचे प्रस्थापित झाले ? सत्ता कोणाला मिळाली व कोणाची वाढली ? त्या भारवाहक चाकरांची कि इंग्रजांची ? तेव्हा इतक्या हिंदुस्थानी माणसांना इंग्रजांनी चाकर्‍या दिल्या, हा काही त्यांच्या नि:पक्षपाती औदार्याचा पुरावा नव्हे. इंग्रजांनीही या देशात प्रसंगोपात कत्तली केल्या, बलात्कार केले, जाळपोळ केली व लूटही केली; परंतु त्यांची तुलना मोगल-तुर्कांशी किंवा घोरी-गझनीशी करता येत नाही. इंग्रजांच्या राज्यात न्याय, शिस्त, कला व विद्या यांना एक स्थान होते. इंग्रजांनी पुण्याला शनिवारवाडा व नागपूरला भोसल्यांचा वाडा जाळला, हे खरेच आहे; पण वेरूळ अजिंठ्यासारख्या सुंदर सुंदर जुन्या वास्तूंचे संरक्षण करण्याची व्यवस्था कर्झनसारख्या इंग्रजांनीच केली, हे ध्यानात ठेवले पाहिजे. तरीही ब्रिटीश स्वधर्म प्रसाराच्या विषयात मुळीच उदासीन नव्हते. गोर्‍या मिशनर्‍यांना त्यांचे साहाय्य व संरक्षण होते. मूर्तीपूजक हिंदूंविषयी सामान्यत: त्यांच्या मनात तुच्छतेची भावना होती. मिश्र रक्‍ताचे, निमगोरे व काळे बाटगे यांचे इंग्रज हे पक्षपाती व साहाय्यकर्ते होते. हिंदु धर्म शक्य तर समूळ नष्ट करून टाकावा, अशी आकांक्षा काही इंग्रजांनी निश्चितपणे व प्रकटपणे बाळगली होती. म्हणजेच इंग्रज अगदी अल्लाउद्दीन, औरंगजेबाच्या बाण्याचे माथेफिरू धर्मवेडे नसले, तरी ते गांधी- नेहरूंसारखे निधर्मीवादी नव्हते. त्यांचे विलायतेतील सिंहासनाधीश तेव्हाही स्वत:ला मोठ्या गर्वाने `ख्रिस्ती धर्माचे संरक्षक' (Defender of the Christion Faith) म्हणवत आणि आजही म्हणवतात आणि अगदी तेच छत्रपती शिवाजी महाराज करत होते. ते स्वत:ला `गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणवत होते. या बिरुदाविषयी त्यांना अभिमान होता. स्वधर्माविषयी त्यांना प्रेम होते. अगदी विशेष प्रकारचे व अगदी प्रकट प्रेम होते.

धर्म एक प्रचंड प्रेरणा !
 

आजच्या अर्थाने छ. शिवाजी महाराज निधर्मीवादी नव्हते. त्या काळात त्यांनी तसे असण्याचे कारण नव्हते. निधर्मीवादाची ही सगळी कल्पनाच अलीकडची आहे. जशी लोकवादाची कल्पना अलीकडची आहे. राष्ट्रवादाची कल्पनाही अलीकडचीच आहे. छत्रपतींच्या काळात धर्म ही एक प्रचंड प्रेरणा होती. (धर्म ही एक प्रचंड प्रेरणा आजही आहे व पुढेही रहाणार आहे.) महाराष्ट्रातल्या व हिंदुस्थानातल्याही लोकजीवनाचे ते एक महत्त्वाचे अंग होते स्वधर्मरक्षण हे राज्याचे व राज्यकर्त्यांचे एक श्रेष्ठ कर्तव्य मानले जात होते.

`धर्मासाठी मरावे । मरोनी अवघ्यांसी मारावे । मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले ।।'
 

ही ललकारी समर्थ रामदासांनी अगदी प्रकटपणे दिली होती. स्वधर्मरक्षण हा स्वराज्य स्थापनेमागील एक बलवत्तर हेतू होता. आपले राज्य झाले, आपल्या हाती सत्ता आली तरच आपल्याला स्वधर्माचे रक्षण व संवर्धन करता येते, हे अनुभवसिद्ध सत्य शिवाजी महाराजांसारख्या प्रतिभावंताला ठाऊक असलेच पाहिजे. आपले राज्य झाले म्हणजे आपल्या लोकांचे दैन्य व दारिद्र्य आपोआप नाहीसे होईल, हेही त्यांना कळले असले पाहिजे. तेव्हा छत्रपतींनी `गोब्राह्मण प्रतिपालक' ही पदवी केवळ अपघाताने स्वीकारली नव्हती. त्यांची स्वधर्मनिष्ठा जाज्ज्वल्य होती. ते आई भवानीचे भक्‍त होते. साधूसंतांच्या दर्शनाला ते आवर्जून जात असत. तीर्थयात्राही करत असत. अगदी आग्रा येथील प्राणावरच्या प्रसंगातून निसटता निसटतादेखील त्यांनी हे केले. गोकर्णक्षेत्री श्रीशंकराला आपले शिरकमळ अर्पण करण्याची ऊर्मीही त्यांना आली होती. इतकी त्यांची धर्मबुद्धी प्रखर होती. धार्मिक उपचारांच्या विषयातही ते उदासीन नव्हते. ते सार्‍या धार्मिक परंपरा अगदी काटेकोरपणे पाळीत असत. तेव्हाच तर त्यांनी रायगडावर स्वत:ला गागाभट्टांकरवी अगदी विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेतला ना ! आणि म्हणूनच त्यांनी त्या वयातदेखील क्षत्रियास आवश्यक असा उपनयन विधी केला. आग्रा येथून शर्थीने सुटल्यावर युवराज संभाजी प्रवासातच मृत्यू पावल्याची आवई संभाजीराजांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी उठवून दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याचे श्राद्धही केले. म्हणजे श्राद्धविधीदेखील त्यांना अनावश्यक वाटत नव्हता. `हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे', ही त्यांची श्रद्धा होती. म्हणजे या हिंदवी स्वराज्याच्या उद्योगास प्रत्यक्ष परमेश्‍वराचे आशीर्वाद आहेत, तेथे त्यांचे अधिष्ठान आहे. असे त्यांना वाटत होते. त्यांना परमेश्‍वरी (श्री भवानीदेवीचे) साक्षात्कारही होत असत. हे त्यांचे ढोंग होते, असे म्हणण्यासारखा मूर्खपणा व उर्मटपणा दुसरा नाही. आपली आजची निधर्मीवादी मापे छत्रपतींना लावणे ही केवळ आंधळी मूढता आहे. त्यांना `पहिला मार्क्सवादी' किंवा `शेतकरी कामकरी क्रांतीचा आद्यप्रणेता' म्हणणे व स्वत:च्या राजकीय पंथात ओढू पहाणे हा त्या मूढतेचा कळस आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे व कष्टकर्‍यांचे कल्याण झाले असेल. आपले राज्य झाल्यावर आपल्या माणसांचे काही कल्याण होणे प्राप्‍तच आहे. एरव्ही त्या राज्यस्थापनेला अर्थ कोणता ? जे दास होते, त्यांच्यातूनच एक शककर्ता निपजल्यावर दास दासच कसे रहातील ? तेही स्वराज्याच्या वैभवाचे वाटेकरी होणारच. तेही स्वराज्य स्थापनेसाठी सुरतेहून सोनेनाणे आणणार व कल्याणचे खजिने हस्तगत करणार. म्हणजे त्यांची हीन अवस्था सुधारणार. त्यांच्या बायकामुलींना सन्मानाने जगता येणार. त्यांची घरे-मंदिरे सुरक्षित रहाणार. राज्य विस्तारासमवेतच त्यांच्या धर्माचे तेज व बळ वाढतच जाणार. त्यांची सर्वांगीण उन्नती होत जाणार. त्यांचा आत्मविश्‍वास वाढणार. दरारा वाढणार. कृष्णा-गोदेच्या काठावर चरणारी त्यांची तट्टे थेट सिंधुपर्यंत दौड करणार व तेथेच ती विजयाचे पाणी पिणार. हिंदवी राज्याच्या स्थापनेमुळे अंती हे सारे झालेच. स्वराज्य स्थापनेला धर्माची प्रेरणा असली की हे सारे होतच असते. `उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया,' असे कृतार्थतेचे उद्‌गार त्या राज्यस्थापनेमुळे समर्थांसारख्यांना काढता आले. या तृप्‍ततेसाठी `लाल मार्क्सवादी' किंवा `शेतकरी कामकरी' क्रांतीची काही एक आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात लाल बावटा देण्याची काही आवश्यकता नाही. तसे करणे हास्यास्पद तर आहेच; पण अतिशय अनैतिहासिकसुद्धा आहे. ते होते धार्मिकच, ते होते हिंदु परंपरेचे पाईकच. ते होते हिंदु संस्कृतीचे अभिमानी. तिचे ते संरक्षक व संवर्धकदेखील होते, अगदी कटाक्षपूर्वक होते. एरव्ही त्यांनी बाटलेल्या नेताजी पालकरला शुद्ध करून, पुन्हा त्याला त्याच्या जुन्या हिंदु धर्मात का आणले ? त्यांनी सार्‍या अरबी, उर्दू, फारसी शब्दांची हकालपट्टी करून शुद्ध संस्कृतनिष्ठ `राज्यव्यवहार कोष' का निर्माण केला ?

जळते अरबी शिक्के पुसून टाका !
उस्मानाबाद, निझामाबाद, अहमदनगर, अहमदाबाद हे जळते शिक्के पुसून त्या गावांना आमचे निधर्मी राज्यकर्ते पुन: स्वत्वाचे पवित्र पाणी देतील काय ? अर्थात आमचे जात्यंध व मतवेडे निधर्मीवादी तसे काही करणार नाहीत; कारण छत्रपतींच्या जातीचा त्यांचा निधर्मीवाद नाही. अन्य धर्मियांनी प्रसन्न व्हावे, म्हणून छत्रपतींनी येथील राष्ट्रीय दैवताचा जयघोष करणार्‍या `हर हर महादेव' या गर्जनेचा त्याग केला नव्हता. ती कापली किंवा तोडली नव्हती किंवा `हर हर अल्ला महादेव' असे तिचे खेचरीकरणही केले नव्हते. श्री भवानीचे व शंभुमहादेवाचे ते पूजक होते. भगवा हाच त्यांचा ध्वज होता. भवानी हीच त्यांची देवता होती. श्री विठ्ठलाचे माहात्म्य ते मानीत होते. स्वराज्याचा उदय हा काजळीने ग्रासलेल्या स्वधर्माचाही उदयकाल होतो. धर्मप्रेमाचा हा धागा अगदी पेशवाईपर्यंत अतूट व अभंग होता. उत्तरेतील काशीप्रयागासारखी तीर्थक्षेत्रे म्लेंछमुक्‍त करण्याची मनीषा पेशव्यांनीही सतत बाळगली होती. ती अनेक अडचणींमुळे फळाला आली नाही, ही गोष्ट वेगळी. पण तीर्थमुक्‍तीची इच्छा, धर्मरक्षणाची आंच त्यांना होतीच होती !

छत्रपतींची सहिष्णुता !

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले ती `काफरशाही' सारखी वाढतच गेली. तिने दिल्लीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही `काफरशाही' अटकेचे पाणी पिऊन तृप्‍त व पुष्ट झाली. या काफरशाहीचे मूळ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी `काफर'सारखे अपशब्द वापरून मुसलमानांची हेटाळणी व छळणा कधी केली नाही; कारण ते सहिष्णू होते. त्यांची परंपरा उदार व सहिष्णू होती; परंतु येथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, आत्मघात व मूर्खता यांच्या परमसीमा गाठणारी त्यांची सहिष्णुता नव्हती. कुराण या ग्रंथाचा त्यांनी मान राखला. परधर्मीय कुलस्त्रीचा मर्यादाभंग त्यांच्या हातून कधी घडला नाही; परंतु प्रसंगच आला तेव्हा कल्याण-भिवंडीच्या मशिदी पाडून टाकावयास ते अगदी कचरले नाहीत. तेथील मुल्लांना त्यांनी बंदीगृह दाखवले. छत्रपतांीसारख्या सहिष्णू व उदार राजालाही ज्याअर्थी हे करावे लागले, त्याअर्थी त्याला तशीच कारणेही असली पाहिजेत. छत्रपती शिवाजी राजांनी जे काही केले, ते देशाच्या व देशबांधवांच्या हिताचेच असले पाहिजे, एवढा विश्‍वास आम्ही त्यांच्या विषयांत बाळगावा, असे त्यांचे कर्तृत्व व चारित्र्य होते; परंतु छत्रपतींसारख्या न्यायी व दूरदर्शी माणसाने जे अगदी नि:संकोच निडरपणे केले, ते सांगतांना आमच्या निधर्मीवाद्यांना संकोच वाटतो. कल्याण-भिवंडीच्या मशिदींचा हा इतिहास दडवून ठेवण्याचा ते (निधर्मीवादी) आटोकाट प्रयत्‍न करतात, पण समकालीन परमानंदाने हा इतिहास आपल्या `शिवभारतात' लिहून ठेवला आहे. तो दडवण्याचे आम्हाला काही कारण नाही. तो दडवण्यात छत्रपतींचा अपमान आहे. सत्याशी प्रतारणा आहे. काल म्हणजे काही आज नव्हे, पण काल जो काही इतिहास घडला त्यापासून शहाण्या माणसांना धडा घेता येतो. असा धडा घेता यावा, म्हणून तर इतिहास लिहिला व वाचला जातो. तेव्हा या इतिहासाशी प्रतारणा करण्याचे आम्हाला कारण काय ? इतिहासाशी प्रतारणा म्हणजे अंती स्वत:शी व स्वहिताशी प्रतारणा ! महाराजांनी काही एका परिस्थितीत कल्याण-भिवंडीच्या मशिदी भुईसपाट केल्या असतील, तर ते सत्य आम्ही मानलेच पाहिजे. त्यामुळे त्या थोर छत्रपतींच्या सहिष्णुतेला यत्किंचितही बाधा येत नाही. सहिष्णू तर ते होतेच ! छत्रपतींची ही सहिष्णुता शहाणी व कणखर होती. म्हणूनच ती हिंदवी स्वराज्याच्या साधनेत उठून दिसली व उपयुक्‍त ठरली !

 


शिवचरित्र : हिंदूंसाठी अखंड स्फूर्तीचा झरा !
 


सनातनचे उत्पादन `सनातन वही'च्या मुखपृष्ठावरील छत्रपती शिवरायांचे चित्र

हिंदूंसमोर वा हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांसमोर कोणताही प्रश्‍न उभा राहिला, तर त्यावर शिवचरित्राच्या अभ्यासातून उत्तर मिळते; मात्र त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र डोळसपणे वाचायला हवे. ते चरित्र जर अहिंसा, सत्य, मुसलमानांचे तुष्टीकरण या गांधींच्या अतिरेकी कल्पनांतून वा `सर्वधर्मसमभाव' म्हणजे हिंदूंना तुच्छ वागणूक देणार्‍या नेहरूंच्या चष्म्यातून वाचले, तर मात्र हिंदूंना त्यांची सुंता झालेलीसुद्धा कळणार नाही ! गांधी-नेहरूंनी आणि त्यांच्या वारसदारांनी `महाराजांचे नाव घ्याल तर खबरदार', अशी वैचारिक दहशत निर्माण केली आहे. माध्यमिक स्तरावरील पाठ्यपुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराजांना हद्दपार करण्यात आले आहे. तिसरी- चौथीतच महाराजांचे चरित्र शिकवून `संपवले' जाते. जणू काही चिऊ-काऊची गोष्टच ती ! मुलांनी वाचावी अन् विसरून जावी. महाविद्यालयीन युवकांना, तरुणांना आणि प्रौढांना शिवचरित्रातून स्फूर्तीच मिळू नये, अशी पुरेपूर व्यवस्थाच राज्यकर्त्यांनी केली आहे. शिवचरित्र हा हिंदूंसाठी अखंड स्फूर्तीचा झरा आहे ! या शिवचरित्ररूपी पवित्र झर्‍यातील ओंजळभर जल प्राशन करायचा हा एक प्रयत्‍न !


हिंदु धर्माचे रक्षण करणे, ही महाराजांची अंत:प्रेरणा !
मोगलांविरुद्ध आपणास का लढायचे आहे, याची जाण महाराजांना बालपणापासूनच होती. मल्हार रामराव चिटणीसकृत `छत्रपती शिवाजी महाराजांचे सप्‍तप्रकरणात्मक चरित्र' या ग्रंथात शहाजीराजांबरोबर विजापूरला रहात असलेल्या बालराजांच्या मन:स्थितीचे नेमके चित्रण करण्यात आले आहे. चरित्रकार बालराजांचे मनोगत व्यक्‍त करतांना लिहितात, ``आपण हिंदु व हे यवन परम नीच, यापरते नीच दुसरे कोण आहे ? त्यांची सेवा करणे, त्यांचे अन्न भक्षणे, आर्जवे करणे, त्यांस नमस्कार करणे यांनी माझे प्रकृतीस फार त्रास उत्पन्न होतो. धर्माची निंदा पहाणे परम अनुचित दिसते. आपण रस्त्यांनी जाता गोवध होतो ते पहाताच त्याचा शिरच्छेद करावा ऐसे वाटते व श्रम वाटतात. गाईस पीडा पाहावी, त्याहून आपले जीवित्व व्यर्थ, वडील काय म्हणतील हेच संकट येऊन पडते; नाहीतरी पाहताच समयी गाईस पीडा करणार्‍याचा वध करावा हे मनात येते. मुसलमानांचा संसर्ग करणे चांगले नाही. तसेच पादशाही दरबारास जाणे अथवा हरएक अमीर याचे घरी जाणे ठीक नाही.'' बालराजे विजापूर दरबारातून परत येताच स्नान करत, दुसरी वस्त्रे नेसत ! गायीला ओढत नेणार्‍या कसायाचा हात तोडण्याचा बालराजांचा शत्रूराज्यातील पराक्रम याच वयातला ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत:करणाची प्रेरणा यावरून स्पष्ट झाल्याविना रहात नाही. या चरित्रकारांनी ती प्रेरणा पुढील वाक्याने आणखीनच स्पष्ट केली आहे. ``आपण हिंदु ! दक्षिण देश सर्व म्लेंच्छांनी ग्रासिला, धर्म अगदी बुडाला. तेव्हा धर्मरक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षावा आणि आपले पराक्रमात नवीन दौलत संपादावी.'' लवकरच बालराजांनी रायरेश्‍वरी शपथ घेऊन व `तोरणा' जिंकून आपले अंत:करण सर्वांसमोरही उघड केले !
 


संकलक :
श्री. संजय मुळये,
रत्नागिरी

महाराजांच्या सैन्यातील मुसलमानांची नावे व पराक्रम सांगा !
सध्याचा काळ हा `सामाजिक समरसते'चा आहे. काँग्रेसवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना `धर्मनिरपेक्ष' आणि `सर्वधर्मसमभावी' ठरवले. आता काही हिंदुत्ववादी कार्यकर्तेही महाराजांना समरसतेच्या गोटात ओढण्यासाठी `महाराजांच्या सैन्यात मुसलमानही होते', असे सांगून धर्मनिष्ठांसमोर अकलेचे तारे तोडतात ! या संदर्भात `मराठी रियासती'चे लेखक व थोर इतिहासकार सरदेसाई लिहितात, ``१६४८ च्या सुमारास विजापूरचे नोकरीतील पाच-सातशे पठाण शिवाजीकडे चाकरीस रहाण्यास आले. शिवाजीच्या मनात त्यास आपणाकडे ठेवायचे नव्हते; परंतु गोमाजी नाईक पानसबळ यांचा सल्ला विचारता बोलला की, `तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही, अशी कल्पना धरली, तर राज्य प्राप्‍त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती, चार्‍ही वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे.'हा सल्ला फार चांगला जाणून राघो बल्लाळ कोरडे याचे निसबतीस त्यास ठेवून घेतले.'' तथाकथित हिंदुत्ववाद्यांना यातील मुख्य गोष्ट माहीत नाही, ती म्हणजे या पठाणी शिपायांवर लक्ष ठेवण्याचीही व्यवस्था महाराजांनी केली होती ! या पाच-सातशे मुसलमान शिपायांनी घरभेदीपणा केला असता, तर त्यांचा कडेलोटही महाराजांनी लगेच केला असता. संसदेवर हल्ला करणार्‍याच्या धर्माकडे पाहून त्याची फाशी लांबवण्याचे दिवस अजून खूप दूर होते ! या संदर्भात इतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर म्हणतात, ``छत्रपती शिवाजी महाराजांकडे `फार' मुसलमान नोकरीत होते, अशी कल्पना करून देण्यात आली आहे. मी काही नावे सांगतो. त्या पलीकडची तुम्ही सांगा ! शिवाजीराजे जेव्हा पुणे, इंदापूर, सुपे या जहागिरीवर आले, तेव्हा शहाजीराजांच्या वतीने जे लोक आले, त्यात तिघे मुसलमान आढळतात. एक होता सिद्दी अंबर बगदादी, दुसरा होता जैनाखान पीरजादे, तिसरा होता बहलिमखान. तसेच शिवाजी महाराजांबरोबर आणखी काही लोक दिले होते. त्यात नूरखान बेग हे नाव आढळते. हा त्यांच्या पायदळाचा मुख्य होता. पण गंमत अशी आहे की, या सगळयांनाच शिवाजी महाराजांनी पुढे कधीतरी हाकलून दिले. का किंवा कसे याची इतिहासात नोंद नाही; पण हे लोक इ.स. १६५७ नंतर आढळतच नाहीत !'' इंग्रजांच्या सैन्यातही अनेक हिंदू होते. महाराजांवर चालून आलेल्या अफझलखानानेही वाईला येताच आपल्या सैन्यात ३ हजार मावळयांची भरती केली होती; पण अफझलखानाला कोणी सर्वधर्मसमभावी म्हणतो का ? मग सर्वधर्मसमभावाची ही घोरपड हिंदूंच्याच गळयात का बांधली जाते ? महाराजांच्या सैन्यात मुसलमान शिपाई होते, यावरून महाराज सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते होते असा दावा करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे !

संस्कृतच्या पुरस्कारातून हिंदुत्वाचा अभिमान !
स्वराज्याच्या उभारणीत प्रत्येक गोष्टीत महाराजांनी हिंदुत्वाचाच पुरस्कार केलेला दिसतो. महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ हिंदु आदर्शांनुसार निर्माण केले. रामायण-महाभारतात अष्टप्रधान असल्याचे उल्लेख आहेत. राजा दशरथाजवळ अष्टप्रधान मंडळ होते. महाभारतातील शांतिपर्वातही राजाने आठ मंत्र्यांसह विचारविनिमय करावा, असे सुचवले आहे. राज्याभिषेकसमयी महाराजांनी सर्व प्रधानांची फारसी नावे बदलून संस्कृत नावे निश्चित केली. महाराजांचे अष्टप्रधान असे - १. पंतप्रधान (पेशवा) २. पंतअमात्य (मज्मूअदार) ३. मंत्री (वाकिया-नवीस्) ४. पंतसचिव (शुरू-नवीस्) ५. सुमन्त (दबीर) ६. सेनापती (सर-ए-नौबत) ७. पंडितराव/दानाध्यक्ष (सद्र, मुहतसिब) व ८. न्यायाधीश (काजी-उल्-कुजात) नवे गड बांधून त्यांना संस्कृतप्रचूर नावे देणे, हा महाराजांचा आवडता छंद होता. १६६५च्या सप्टेंबरात म्हणजे दसर्‍याला स्वारीला निघण्यापूर्वी तोपर्यंतच्या स्वराज्यातील किल्ल्यांची नावे तपासून हौशीने त्यांनी ती बदलली. मल्हार रामराव चिटणीसकृत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सप्‍तप्रकरणात्मक चरित्रग्रंथात गडांसंबंधी पुढील उल्लेख आहे. `महाराजांनी दबावासाठी जागा जागा किल्ले नवेच बांधिले. वारूगड, भूषणगड, महिमागड, वर्धनगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे नवेच बांधिले.' मराठ्यांचा इतिहास या ग्रंथात म्हटले आहे, `शिवाजी संस्कृतप्रेमी होता. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याने गडांची नावे बदलून ती राजगड, विशालगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, प्रचंडगड, पांडवगड अशी संस्कृत नावे ठेवली.'

शिवचरित्रापासून स्फूर्ती न घेण्याचे परिणाम
लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, तर स्वा. सावरकरांनी १९०८ साली लंडनमध्येही शिवोत्सव साजरा केला. शिवचरित्राचे महत्त्व या दोघांनाही पुरेपूर उमगले होते; मात्र गांधी-नेहरूंनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यापासून शिवचरित्राला कटाक्षाने दूर ठेवले. त्यामुळे अवघ्या ३०० वर्षांपूर्वी पाच-पाच मुसलमानी पातशाह्यांना नेस्तनाबूत करून हिंदु सिंहासनाधिष्ठित झाले होते, हे बहुतांश हिंदूंना १९२० नंतर आठवलेच नाही आणि त्यांनी मुकाटपणे फाळणी स्वीकारली. शिवचरित्रापासून स्फूर्ती घेण्याचे नाकारल्यामुळे महाराजांनी नष्ट केलेल्या मुसलमानी सत्ता पाकिस्तान व बांगलादेश ही नवी नावे धारण करून परत हिंदूंच्याच उरावर बसल्या आहेत. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणार्‍या, शाहिस्तेखानाची बोटे तोडणार्‍या शिवचरित्रातील प्रसंगांचे मर्म उलगडून न दाखवल्यामुळे मुफ्ती महमदच्या मुलीची सुटका होण्यासाठी आम्ही कट्टर दहशतवादी सोडतो, कंदाहारला विशेष विमानातून नेऊन आमचा परराष्ट्रमंत्री हिंदूंच्या कसायांना मुक्‍त करतो, काश्मीरमध्ये १६ हिंदूंच्या माना कापणारा दहशतवादी बिट्टा कराटेला `पॅरोल'वर सोडले जाते ! अफझलखानाला ठार मारल्यानंतरच्या २३ दिवसांत महाराजांनी १५ गड जिंकले; मात्र आजच्या राज्यकर्त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्षाच्या आत काश्मीरचा एक तृतीयांश भूभाग गमावला ! महाराजांच्या पराक्रमाला घाबरून औरंगजेबाने महाराज असेपर्यंत दक्षिण भारतावरील मोहिमेचे नावही काढले नव्हते. सध्या मात्र लबाड व कावेबाज मुशर्रफ भारतात येऊन कधी आग्रा परिषद उधळून लावतात, तर कधी स्वत:च्या विमानावर भारताचा तिरंगा उलटा लावतात !

धर्म-अधर्माच्या लढ्याची प्रजेलाही सुस्पष्ट जाण !
मोगलांविरुद्ध का लढायचे याची सुस्पष्ट जाण जशी महाराजांना होती, तशी त्यांच्या प्रजेलाही होती. आगर्‍याला बंदिवासात पडलेले महाराज तेथून जिवंत परत येतील की नाही, अशीच परिस्थिती होती. अशा स्थितीतही स्वराज्याच्या सूत्रधारांचा व मावळयांचा जराही थरकाप उडाला नाही. त्यांनी महाराजांच्या धोरणानुसार स्वराज्य राखून दाखवले. आपल्या घरातील मंगल कार्य सोडून मावळे प्रत्यक्ष मृत्यूला मिठी मारायला जात. सिंहगड, पावनखिंड, आग्रा..... किती ठिकाणे सांगावीत ? या धर्म-अधर्माच्या लढ्यात अनेक मातापित्यांना पुत्रशोक सहन करावा लागला आणि अनेक स्त्रिया विधवा झाल्या. आपण मोगलांविरुद्ध का लढतोय, हे या सर्वांना माहीत होते. एखाद्या मोगल सरदाराकडून बलात्कारित होऊन मिळमिळीत सौभाग्य राखण्यापेक्षा ढळढळीत वैधव्य या भगिनींनी पसंत केले. याउलट कंदहार प्रकरणात अपहृत विमान प्रवाशांचे प्राण वाचावेत, यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी केलेला तमाशा सर्व भारताने पाहिला. आपला लढा कोणाबरोबर आहे, हेच केंद्र सरकार व बहुतांशी जनता विसरून गेली आहे ! आजच्या राज्यकर्त्यांना आणि बहुतांश प्रजेलाही आपण ब्रिटिशांना का घालवले, याचा नीटसा उलगडा झालेला नाही. हिंदुस्थानच्या राजसिंहासनावर माऊंटबॅटन जाऊन औरंगजेब बसावा यासाठी हिंदु वीरांनी रक्‍त सांडलेले नाही. ते कळले असते तर आम्ही काश्मीर खोरे निर्हिंदु करणार्‍या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलो नसतो, कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान घुसखोर देशात ठेवून घेतले नसते आणि अरुणाचलवर हक्क सांगणार्‍या चिनी राजदूतालाही लगेच हाकलले असते. स्वातंत्र्याची व स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांपासून न घेतल्याचे हे परिणाम आहेत !

भारतीय राजधर्माच्या वेलीला आलेले सुंदर फूल !
महाराजांचे वर्णन करतांना शिवप्रेमी श्री. म.श. वाबगांवकर लिहितात, ``भारतीय राजधर्माच्या वेलीला आलेले `शिवाजी' एक सुंदर फूल होते. भारतीय राजधर्माचा थोर प्रवक्‍ता कौटिल्य. त्याने आपल्या अर्थशास्त्रात कल्पिलेला आदर्श राजा त्याच्यानंतर दोन सहस्र वर्षांनी शिवाजीच्या रूपाने जन्मास आला. कौटिल्याच्या कल्पनेतला राजा हेरगिरीवर भर देणारा, आक्रमणाचे सर्व फायदे आपल्या पदरात पाडून घेणारा, विलासशून्य व उपभोगशून्य, न्यायी व धर्मशास्त्र जाणणारा असतो. चारित्र्यवंताखेरीज इतरांना राजदंड पेलणार नाही, असे कौटिल्याने म्हटले आहे. शिवाजीच्या संदर्भात तेही अन्वयार्थक ठरते.'' १९२० नंतर भारतीय राजधर्माच्या वेलीला सर्वधर्मसमभाव, मुस्लीम तुष्टीकरण यांचे खतपाणी घातल्यामुळे अनेक विषारी फुले आली. या फुलांची नावे कधी मोहनदास-जवाहरलाल असतात, तर कधी मनमोहन-सोनिया अशी असतात ! या विषारी फुलांची उत्पत्ती थांबवण्यासाठी भारतीय राजधर्माच्या वेलीला सनातन वैदिक धर्मदंडाचा आधार देऊन शिवचरित्ररूपी गंगाजलच घालायला हवे ! तसे झाले की या वेलीच्या पानोपानी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी सुंदर फुले येतील आणि भारतीय राजधर्माचा वेलू गगनावरी जाईल !

 


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज:पुंज तत्त्व


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज:पुंज तत्त्व आहे, ती एक दिव्य स्फूर्ती आहे. हा मानव नव्हे, देव आहे. एका दिव्य व पवित्र संस्कृतीच्या उदरी जन्माला आलेला आदिदेव ! इतकी निष्कलंक विभूती अन्य धर्मियांच्या इतिहासाने पाहिलेली नाही. बलीष्ठ असूनही बलात्कारी नसणारा, अभिषिक्त असूनही मदांध नसणारा, शौर्याने शत्रूंचे दमन करणारा, मानव असूनही देवाधिक कृती करणारा असा राजा कोठेही झाला नाही ! महाराज, तुमचे कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना ! महाराष्ट्रात शिवजयंती म्हणजे मिरवणूक, गुलाल उधळणे व जयजयकार एवढाच प्रकार असतो. येथे बसलेल्या २५० ते ३०० जणांपैकी केवळ चार-पाच जणांनीच शिवचरित्र पूर्ण वाचले आहे. हे दुर्दैवी प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात आहे. अशांकडून शिवजयंती कशी साजरी होत असेल, याचा विचारच न केलेला बरा. - श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) (कुर्डूवाडी, जिल्हा सोलापूर येथील भाषणातील अंश)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, १९.२.२००७

 


छत्रपती शिवाजी महाराज जन्मतिथी वाद


संकलक :
डॉ. गौतम गोळे,
आंध्रप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगप्रवर्तक राजाच्या जन्मतिथीचा घोळ व त्यानिमित्तचा वाद, महाराष्ट्रामध्ये गेली ८८ वर्षे सुरू आहे. खरी शिवजन्मतिथी वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) शके १५४९ (सन १६२७) असतांना, महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (सन १६३०) ही जन्मतिथी, कुणाशीही चर्चा न करता निश्चित केली आहे. अनेक पुराव्यांवरून वैशाख शुद्ध तृतीया हीच शिवजन्मतिथी असल्याचे सिद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा मराठी माणसांचेच नव्हे, तर समस्त हिंदूंचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी हे एक श्रीमान योगी, आदर्र्श राज्यकर्ते, क्षात्रधर्म व राजधर्म यांचे पालन करणारे आदर्र्श राजे. स्वामी विवेकानंदांनी त्यांचे वर्णन `या वसुंधरेने असा क्षत्रिय गेल्या पाच हजार वर्र्र्षांत जन्माला घातलेला नाही', असे केले आहे.
`काशीकी कला जाती, मथुरा मशीद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी ।',
असा त्यांचा गौरव कवी भूषण यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी - वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) शके १५४९ (सन १६२७) छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी वैशाख शुद्ध तृतीया, (अक्षय तृतीया) शके १५४९ प्रभव संवत्सर, रविवार सूर्योदय (शनिवार संपाताचा) रोहिणी नक्षत्र, हीच होती. सन १९०८ मध्ये अकोला येथे शिवजयंती उत्सव याच तिथीला साजरा झाला. त्या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे व वक्‍ते म्हणून लोकमान्य टिळक, श्री. दादासाहेब खापर्डे व संत गजानन महाराज होते.
(संदर्भ - श्री गजानन विजय / चरित्र)
हीच तिथी अनेक ग्रंथोग्रंथी छापलेली होती. त्या वेळी कसलाही वाद नव्हता, शंका नव्हती, अनिश्चितता नव्हती, तिला दुसरा पर्याय नव्हता. शेडगावकर भोसले बखर, वि.गो. भिडेकृत सातारा भोसले घराण्याचा इतिहास, जनार्दन सरंजामेकृत शकावली, हनुमंतस्वामीकृत बखर, श्री शिवाजी चरित्र - गणेशशास्त्री लेले त्र्यंबककर, श्री गजानन विजय, जेम्स ग्रँट डफ लिखित `मराठ्यांचा इतिहास' वगैरे अनेक ग्रंथांतून याच जन्मतिथीला आधार सापडतो. सर्व १७ बखरींमधून शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल पक्ष पहिले २-३ दिवस असा उल्लेख सापडतो. इतिहासतज्ञ श्री. जदुनाथ सरकार (`हाऊस ऑफ शिवाजी व शिवाजी अँन्ड हिज टाइम्स' या ग्रंथांचे लेखक), रियासतकार गो.स. सरदेसाई, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, वि.स. वाकसकर, प्रो. चिं.ग. भानू, दाजीसाहेब नागेश आपटे, प्रा. न.र. फाटक, प्रबोधनकार के.सी. ठाकरे इत्यादी अनेक इतिहासतज्ञ इतिहास ग्रंथलेखकांनी व विवेकी विचारवंतांनी `फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, सन १६३० फेब्रुवारी १९ ही तिथी पूर्णत: खोटी, बनावट व शिवचरित्राशी पर्यायाने मराठा स्वराज्याच्या संस्थापनापूर्व काळापासून उभारणीशी विसंगत आहे. अविश्‍वासार्ह व अग्राह्य आहे. तिचा विचारही करता कामा नये, असे ठामपणाने अनेक लेख लिहून व पुस्तकांतून दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून चुकीची जन्मतिथी व जन्मतारीख यांची निश्चिती
`फाल्गुनवाद्यां'चे सत्य मानून महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी निश्चित केली. सन १६३० मध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला १९ फेब्रुवारी ही तारीख होती. म्हणून १९ फेब्रुवारी १६३० अशी शिवजन्मतारीख महाराष्ट्र शासनाने निश्चित केल्याचे ८ फेब्रुवारी २००० रोजी जाहीर केले. सरकारी पातळीवरून, शिक्षण विभागांनी फर्माने काढून पाठ्यपुस्तकांतील `शिवजन्मतिथी' बदलून घेण्याचे आदेशही सोडले.


एकीकडे राजकीय नेते सांगत राहिले की, आम्ही आमच्या सोयीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करू. ज्याला ज्या तिथीला पाहिजे, त्या तिथीला त्यांनी शिवजयंती साजरी करावी.' पण मग शासनाला `शिवजन्मतिथी' पूर्णत:च बदलून टाकण्याचे असे कोणते साध्य डोळयांपुढे होते ? ८ फेब्रुवारी २००० रोजी हा नेमका निर्णय शासनाने जाहीर करावा, हा उभ्या महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्राचाही कडेलोट आहे. ही असली शिक्षा कुणाला दिली आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अद्वितीय युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापकांच्या जन्मतिथीला सोयीचे निमित्त करून शिवजन्मतिथीच बदलण्याची फर्माने काढणे, ही इतिहासाची क्रूर थट्टा आहे. असा हा देशदैवदुर्विलास मुख्यत: श्री शिवजन्मतिथीच्याच वाट्याला का ? छत्रपतींच्या स्पर्धकांना म्हणा वा वैर्‍यांनाही म्हणा, जे धाडस पावणेचारशे वर्षे करण्याचे स्वप्नातही आले नाही, ते ८ फेब्रुवारीला एका क्षणात विनाचर्चा घडून आले. युतीच्या नेत्यांनी आश्‍वासने दिली होती की, तज्ञांशी चर्चा करून पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेऊ; परंतु त्या वेळी त्यांना वेळीच सावध केले गेल्याने त्यांनी `शिवजयंती सुट्टी' बदलली नाही; परंतु काँग्रेसच्या आघाडी शासनाला जर शिवजयंतीचे स्वातंत्र्य उद्घोषित करण्याचे भान बाळगता आले, तर मग शासनाने पारंपरिक शिवजन्मतिथीचे उच्चाटनच कोणत्या व कोणाच्या सोयीसाठी केले ? राष्ट्रपुरुषाची जयंती अनिश्चित तारखेला नको, ती निश्चित तारखेला हवी, म्हणून तिथी नको; कारण राष्ट्रीय संकल्पनेचे पुरस्करण महत्त्वाचे, अन्यथा दुसरे निमित्त काय ? तिथी म्हणजे मागासलेपणा का ? रामनवमी, गुढीपाडवा, विजयादशमी, कृष्णाष्टमी, शिवरात्री यांना कुठल्या राष्ट्रीय तारखा द्यायच्या ? शिवजयंतीला हवी ती तारीख शासनाने बहाल केली होती ना ? मग शिवजन्मतिथीच मूलत: बदलण्याचे काय प्रयोजन ?

फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (सन १६३०) ही तिथी अस्तित्वात कशी आली असावी व ती चूक कशी ? `शिवभारत' हे काव्य शिवसमकालीन कवी परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या हयातीत सन १६३३ मध्ये रचलेले आहे. त्यामुळे ते विश्‍वासार्ह मानले पाहिजे. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया, (सन १६३०) ही तिथी सांगितली आहे; पण शिवजन्मतिथी हेतूत: बनावटी बनवून खोटीच पण तरीही तिच्यातूनच खरी जन्मतिथी व्यक्‍त होईल, अशा कौशल्याने परमानंद यांनी सांगितली आहे; कारण जर फाल्गुन वद्य तृतीया, ही तिथी खरी मानली, तर १७ बखरीत वैशाख वद्य तृतीया (अक्षय तृतीया) अशी तिथी कशामुळे आहे ? कवी परमानंदांनी खरी तिथी प्रकट केली नाही; कारण पूर्वी जारणमारण, अभिचार प्रयोग करून शत्रूचा नाश करता येतो, याची माहिती असल्याने खरी जन्मतिथी प्रकट न करण्याची परंपरा होती. शिवभारतचे फसवे श्लोक उचित सुसंगतीने न उलगडल्याने `फाल्गुनवादी' फाल्गुनी तिथीबद्दल आग्रही राहिले. परमानंद यांनी, शिवभारतमध्ये वर्णिलेली शिवजन्मतिथी खरी नाही. ती खर्‍या मूळ शिवजन्मतिथीची `गुढार्थदर्शी छाया' आहे. ती श्लेषार्थक आहे. कवीने खरी शिवजन्मतिथी याच काव्यातील द्वयर्थी शब्दांतच ठेवून बनावट तिथी प्रकट केली आहे. तिच्यातून खरी जन्मतिथी आपण समजवून घ्यावयाची आहे. या दिशेने प्रयत्‍न केल्यास याच काव्यातून फाल्गुनदर्शी शब्दांतून वैशाखदर्शी शिवजन्मतिथी आपल्यासमोर उभी रहाते.

 


छत्रपति शिवाजी महाराज यांच्या चित्राला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तोंड रेखाटणारे धर्मद्रोही (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २.१.२००४)

या धर्मद्रोह्यांना विसरू नका !

हिंदूंच्या देवतांना नट, राजकारणी व खेळाडू यांचे मुखवटे लावून त्यांचा हेतुपुरस्सर तिरस्कार करणारे हिंदु धर्मद्रोही महाविद्यालय !

सध्या कोणीही उठतो व हिंदूंच्या देवता आणि इतर श्रद्धास्थाने यांचा विविध माध्यमांतून हेतुपुरस्सर तिरस्कार करतो. या धर्मद्रोही कृत्यांबाबत शासनही बघ्याची भूमिका घेते. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा जाहीररीत्या होणारा हा हेतुपुरस्सर तिरस्कार थांबावा, यासाठी जागृत हिंदूंनीच ठोस कृति करायची वेळ आली आहे. धर्मद्रोह्यांच्या या कृत्यांची माहिती मिळावी व माहिती वाचून जागृत हिंदूंनी कृतिशील व्हावे यासाठी धर्मद्रोह्यांच्या कृत्याची माहिती येथे देत आहोत.


हिंदूंच्या देवतांना नट, राजकारणी व खेळाडू यांचे मुखवटे लावून त्यांचा हेतुपुरस्सर तिरस्कार करणारे हिंदु धर्मद्रोही महाविद्यालय !
वरळी, मुंबई येथील एल्.एस्. रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूट या महाविद्यालयामधील कला विभागातील विद्यार्थ्यांचे चित्रांचे प्रदर्शन मार्च २००३ मध्ये महाविद्यालयात भरवले होते. या प्रदर्शनात कला विभागातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी श्री. निलेश कुंजीर याने हिंदूंच्या देवता, संत व विभूती यांचा हेतुपुरस्सर तिरस्कार केला. या प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रांत श्री. कुंजीर यांनी चित्रांमध्ये शिवाच्या चित्राला अभिनेता श्री. अमिताभ बच्चन यांचे तोंड रेखाटले होते, कालीमातेच्या चित्राला अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉय, हनुमानाच्या चित्राला खासदार श्री. लालूप्रसाद यादव, श्री विष्णूच्या चित्राला राष्ट्रपति श्री. ए.पी.जे. अब्दुल कलाम, भगवान श्रीकृष्णाच्या चित्राला क्रिकेटपटु श्री. सचिन तेंडुलकर, श्री स्वामी समर्थ यांच्या चित्राला पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी, महालक्ष्मीदेवीच्या चित्राला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या चित्राला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, तर आणखी एका संतांच्या चित्राला ओसामा-बिन-लादेन याचे तोंड रेखाटले होते. याबाबत सनातनच्या साधकांनी श्री. कुंजीर यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्‍न केला; मात्र त्यांनी साधकांना उलट उत्तरे दिली. हेच महाविद्यालय मुसलमान, िख्र्चाश्‍न व बौद्ध या पंथांतील श्रद्धास्थानांचा हेतुपुरस्सर तिरस्कार करणार्‍या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यास धजावेल का ? हिंदूंच्या मृतवत्पणामुळे त्यांच्या धर्मभावनांचा हेतुपुरस्सर तिरस्कार होत आहे.

 


म्हणे मुसलमान `स्वराज्यनिष्ठ' ! (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २४.२.२००७)

पुणे येथे शिवजयंतीच्या निमित्ताने मुसलमानांनी वाटली खोटारडी पत्रके !


पुणे, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - पुण्यातील `राष्ट्रप्रेमी कृती समिती'च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने एका मुसलमान लेखकाने लिहिलेले एक पत्रक शहरात मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आले. `छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मुसलमानांची स्वराज्यनिष्ठा' या मथळयाखाली स्वराज्यस्थापनेच्या महान कार्यात मुसलमानदेखील सहभागी होते, हे दाखवण्याचा प्रयत्‍न या पत्रकात करण्यात आला आहे. (या पत्रकामध्ये लेखकाने `हिंदवी स्वराज्या'चा उल्लेख निवळ `स्वराज्य' असा करून छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य व त्यासाठी प्राणार्पण केलेला प्रत्येक मावळा यांचा घोर अपमान केला आहे. हिंदूंनो, ही विटंबना आणखी किती काळ सहन करणार आहात ? - संपादक)

या खोटारड्या पत्रकातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये ३७ टक्के इस्लाम धर्मीय सैनिक होते. (असे नसून उलट छत्रपती शिवरायांकडे अगदी मोजकेच मुसलमान नोकरीस होते. या मुसलमानांनाही पुढे कधीतरी महाराजांनी हाकलून दिले. असे का, त्याची नोंद इतिहासात नाही. इ.स. १६५७ नंतर तर छत्रपतींच्या सैन्यात मुसलमान आढळतच नाहीत, अशी महत्त्वपूर्ण नोंद प्रसिद्ध इतिहाससंशोधक श्री. निनाद बेडेकर यांनी केली आहे. - संपादक) छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वपूर्ण बाबतीत त्यांचे वकील काझी हैदर यांचा सल्ला घेत असत. (छत्रपती शिवाजी महाराज हे स्वत: बुद्धीमान व द्रष्टे होते. समर्थ रामदासस्वामींसारखे महान संत त्यांना गुरु म्हणून लाभले होते. असे असतांना त्यांना कोण्या मुसलमान काझीच्या मार्गदर्शनाची काय गरज ? - संपादक) छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती नूर खान बेग हे होते. अफजलखानाच्या भेटीच्या प्रसंगी शिवरायांच्या विश्‍वासू अंगरक्षकांमध्ये सिद्दी इब्राहिम हा अंगरक्षक होता. छत्रपती शिवरायांच्या २७ शरीररक्षकांपैकी १२ शरीररक्षक हे मुसलमान होते. रत्‍नागिरी जिल्ह्यातील केळशी या गावातील बाबा याकूत हे मुस्लिम संत छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते. स्वराज्याच्या हितासाठी आपल्या सर्वस्वाचे बलीदान करण्यास मुसलमान नेहमीच दोन पावले पुढे होते. इतकी उदंड अभेद्य राजनिष्ठा मुसलमानांची शिवरायांच्या स्वराज्याशी होती. या पत्रकाच्या शेवटी आवाहन करण्यात आले आहे, `अशा महान जाणत्या राजाने आपले संपूर्ण जीवन समता आणि समानता यांसाठी वेचले व धर्मनिरपेक्षतेचे सुंदर प्रबोधन घडवून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला चालना देऊन स्वराज्याची स्थापना केली. अशा महान जाणत्या राजाचे राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आपण सर्वांनी आपापल्या परीने आपापल्या धर्माची आराधना कट्टरतेने करा; परंतु ही आराधना करतांना सदैव आपल्या हृदयात सर्वधर्मसमभाव हे वैशिष्ट्य असलेल्या आपल्या महान संस्कृतीचा अभिमान बाळगा.' (आपापल्या धर्माची कट्टरतेने आराधना करा, असे सांगायला न विसरणार्‍या लेखकाने त्याचा `मुसलमानपणा'च दाखवून दिला आहे. हिंदूंनो, अशा धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा ! - संपादक) सदर मजकुराचे लेखन तथाकथित इतिहाससंशोधक ताहीरभाई शेख यांनी केल्याचे पत्रकाच्या शेवटी छापण्यात आले असून `बहुजन प्रतिपालक, धर्मनिरपेक्ष, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुस्लिम समाजबांधवांचा मानाचा मुजरा' असेही छापण्यात आले आहे. `स्वराज्यनिष्ठेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रभक्‍त समाज म्हणून गौरव केलेला असतांनाही मूळ निवासी मुस्लिम बांधवांना राष्ट्रभक्‍त समाज म्हणून प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता आहे का ?' असे छापून पत्रकाचा शेवट करण्यात आला आहे. (मुसलमान राष्ट्रभक्‍त आहेत, तर भारतातील प्रत्येक दहशतवादी कृत्यामध्ये मुसलमानांचाच सहभाग का असतो ? तसा तो असूनही आतापर्यंत एकाही मुसलमानाने एखाद्या मुसलमान दहशतवाद्याला पकडून दिल्याचे उदाहरण का नाही ? - संपादक) सदर पत्रक वाचून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून वाटण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या समितीचे संस्थापक अध्यक्ष अंजुम इनामदार, बोपोडी, पुणे ३ हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५००७८९८६ व संपत्र पत्ता : rashtrapremi@yahoo.co.in असा आहे.

 


म्हणे शिवाजी महाराजांसाठी प्राणार्पण करणारे बहुसंख्य लोक मुसलमान होते ! (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २३.२.२००७)

मुसलमानधार्जिणे अँड्. गोविंद पानसरे यांचा जावईशोध !


सावंतवाडी, २२ फेब्रुवारी (वार्ता.) - शिवाजी महाराजांसाठी प्राणार्पण करणारे व प्रसंगी त्यांना वाचवणारे यांमध्ये बहुसंख्य मुसलमान होते. शिवाजीच्या लढायांना कोणी धर्मयुद्धाचा रंग देऊ नये. आज खोटा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे दलितांनी आंबेडकर यांच्यासारख्या लोकांची छायाचित्रे, पुतळे यांचा साठा न करता त्यांचे वाङ्मय वाचावे व खर्‍या इतिहासाचा अभ्यास करावा'', असे वक्‍तव्य मुसलमानधार्जिणे कॉम्रेड अँड्. गोविंद पानसरे यांनी करून त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन घडवले. (धादांत खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणारे कॉ. पानसरे ! छत्रपती शिवरायांकडे अगदी मोजकेच मुसलमान नोकरीस होते. या मुसलमानांनाही पुढे कधीतरी महाराजांनी हाकलून दिले. का किंवा कसे याची नोंद इतिहासात नाही; मात्र हे मुसलमान इ.स. १६५७ नंतर आढळतच नाहीत, अशी महत्त्वपूर्ण नोंद प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर यांनी केली आहे. - संपादक) शिवजयंतीच्या निमित्ताने येथील श्रीराम वाचन मंदिरात कॉ. अँड्. पानसरे यांचे `शिवाजी कोण होता?', या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते म्हणाले, ``शिवाजीला देव मानू नका. (जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत करणारे नतद्रष्ट व उद्धट कॉ. पानसरे ! - संपादक) ती एक असामान्य व्यक्‍ती होती. एखाद्यास देव केले की, आपली जबाबदारी संपली, असे सामान्य माणसाला वाटते. त्यामुळे त्याच्या कर्तृत्वाला मर्यादा येतात. शिवाजीवर भवानीदेवीचा वरदहस्त होता, याऐवजी त्याचे कर्तृत्व कसे होते, हे पहा. सर्वधर्मसमभावाच्या पातळीवर शिवाजीची शिकवण आपण कशी आचरणात आणू शकू, हे महत्त्वाचे आहे. (सर्वधर्मसमभावाचे फसवे तत्त्वज्ञान हिंदूंना सांगून त्यांना धर्मनिष्ठेपासून परावृत्त करणारे धर्मद्रोही पानसरे ! - संपादक) काही वेळा शिवाजी पळून गेला, असे म्हटले, तर कसे तरी वाटते ना ? पण ते सत्य आहे; परंतु तो त्यांच्या गनिमी काव्याचा एक भाग आहे, हे समजून घ्या. बिकट प्रसंगी शिवाजीला प्राणांपासून वाचवणारी मंडळी बलुतेदारांपैकीच होती. त्यातही मुसलमान बहुसंख्य होते, असे अँड्. पानसरे यांनी सांगितले. (हिंदूंनो, समाजाला खोटा व मुसलमानधार्जिणा इतिहास सांगणार्‍या अशा तथाकथित विचारवंतांना धडा शिकवा! - संपादक)समाजकारण, राजकारण यांवर आजही शिवाजीचा प्रभाव आदर्श म्हणून शिवाजी आजही समाजकारण, राजकारण यांवर प्रभाव टाकतात. शिवाजी आप्‍तस्वकीय व परकीय यांस समानतेची वागणूक देत व प्रसंगी शिक्षाही तशीच जरब बसविणारी देत असत. आजचे लुच्चे लबाड लोक व राजकारणी `शिवाजी महाराज की जय!' म्हणून नुसते बोंबलतात; (ही आहे निधर्मीवाद्यांची (अ) नीतीमत्ता ! - संपादक) शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते, असे म्हणून त्याचा जयजयकार करत एखाद्याचा कोथळा बाहेर काढणे हे योग्य आहे का ? शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात हिंदु, मुसलमान सर्वांना न्याय होता. `आमचा धर्म आम्हास प्यारा व त्यांचा धर्म त्यांना प्यारा', असे शिवाजी म्हणत असे. (मुसलमान दहशतवादी काश्मीर, तसेच देशभरात हिंदूंचे कोथळे बाहेर काढतात व इस्लाम प्यारा म्हणतात, हे अँड्. पानसरेंना दिसत नाही का ? छत्रपती शिवरायांनंतर आजपर्यंत कोणत्याही हिंदूने मुसलमानाचा कोथळा बाहेर काढल्याचे ऐकिवात नाही, असे असतांना हिंदूंना आक्रमक ठरवणारे हिंदुद्वेष्टे कॉ. पानसरे ! - संपादक) शिवाजी महाराज स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नसत. हे कोणाचे कार्य आहे ? गो म्हणजे गायीचे तर नाहीच नाही, तर ब्राह्मणांचे आहे. (लोकहो, जाहीर कार्यक्रमात ब्राह्मणद्वेष्टे विधान करून समाजात दुही पसरवणारे समाजद्रोही अँड्. पानसरे यांना जाब विचारा ! अशांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाका ! - संपादक)

 


शिवरायांना `धर्मनिरपेक्ष' संबोधून त्यांच्या तथाकथित निष्ठावंत मुसलमान सरदारांची यादी वृत्तपत्रातून प्रसिद्ध (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २०.२.२००७)

पुणे, १९ फेबु्वारी (वार्ता.) - पुण्यातील `दैनिक सकाळ' वृत्तपत्रात आज शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना `धर्मनिरपेक्ष' असे संबोधून त्यांनी सामावून घेतलेल्या मुसलमान सरदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या मथळा `स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मुस्लिमांना सहभागी करून घेऊन त्यांना योग्य ती संधी देणार्‍या धर्मनिरपेक्ष महापराक्रमी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !' असा देण्यात आला आहे, तर `हिंदवी स्वराज्य' हा शब्द हेतूपुरस्सर टाळण्यात आला आहे. (शिवाजी महाराजांनी मोगलांच्या अत्याचारी राजवटीस नष्ट करण्याची मुहूर्तमेढ रोवली. यात महाराजांच्या वतीने मुसलमान सरदाराने शौर्य गाजवले, असा कोणताही उल्लेख इतिहासात सापडत नाही. तरीही शिवाजी महाराजांना `धर्मनिरपेक्ष' ठरवून छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्याला जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्‍न करणार्‍या मुसलमानांना आताच रोखले पाहिजे. - संपादक) या जाहिरातीच्या खाली माजी पोलीस महानिरीक्षक श.मि. मुश्रीफ, कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख, माजी उपजिल्हाधिकारी बी.ए. मुजावर इत्यादींची नावे देण्यात आली आहेत. तसेच `स्वराज्य निर्मितीच्या महान कार्यात आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांना मोलाची मदत करणार्‍या वरील मुस्लिम बांधवांचा आम्हाला अभिमान वाटतो' असेही छापण्यात आले आहे. (केवळ `स्वराज्य' नव्हे, तर `हिंदवी स्वराज्या'ची निर्मिती करण्यात आली. जाणीवपूर्वक `हिंदवी स्वराज्य' शब्द टाळणारे मुसलमान म्हणे `धर्मनिरपेक्ष` ! - संपादक) या जाहिरातीमध्ये बर्‍याच निष्ठावंत मुसलमान सेवकांची नावे देण्यात आली असून त्यांनी केलेली कामगिरीही थोडक्यात देण्यात आली आहे. शेवटी दिलेल्या मुद्यांत शिवाजी महाराजांनी भारतात प्रथम आरमार सुरू केले. त्यातील शेकडो अधिकारी व सैनिक मुसलमान होते, असेही छापण्यात आले आहे. (इतिहासाचा खून करणारे मुसलमान ! इतिहासात नसलेले संदर्भ सांगून जनतेमध्ये गैरसमज पसरवणार्‍या अशा जाहिरातींच्या विरोधात हिंदूंनी जाब विचारायला हवा ! - संपादक)

 


छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान करणार्‍या काँग्रेस पक्षाचा बदला घ्या !- नरेंद्र मोदी (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २९.१.२००७)

पुणे, २८ जानेवारी (वार्ता.) - गुजरातमध्ये `जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग चालू झाले, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांवर टीका करत `त्यांनी सुरत लुटली होती, हे लुटारू आहेत', असे म्हणून या नाट्याला विरोध केला होता. तसेच वीर सावरकरांच्या बाबतीतही झाले. काँग्रेसच्या लोकांनी अंदमान तुरुंगातील त्यांची वाक्ये काढून टाकली, त्याबाबतही काँग्रेसने काहीही उत्तर दिले नाही. शिवाजी महाराजांना `लुटेरे' म्हणणार्‍या आणि वीर सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसचा या निवडणुकीत बदला घ्या, असे आवाहन पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप- सेनेच्या युतीच्या प्रचारासाठी आलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज पुणेकरांना केले. पंतप्रधानांवर टीका करत श्री. मोदी म्हणाले की, सत्तेवर आल्यावर काँग्रेसने पहिले काम काय केले, तर `पोटा' कायदा रद्द केला. त्या दिवशी मिठाई वाटली गेली, फटाके वाजवले गेले. ते कोणी वाजवले, दहशतवाद्यांनीच वाजवले आहेत. अशा दहशतवाद्यांना मदत करणार्‍या पक्षांना तुम्ही मते देणार आहात काय, असा प्रश्‍न श्री. मोदी यांनी या वेळी केला. श्री. मोदी मुख्यमंत्री श्री. देशमुख यांच्यावर टीका करतांना म्हणाले की, गुजरातमधील नर्मदा नदीवर जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी वीज महाराष्ट्रालादेखील मिळणार असतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच या प्रकल्पाच्या विरोधात मत टाकले; पण शेवटी मी आंदोलन करून तो प्रकल्प राबवण्यास केंद्र सरकारला भाग पाडले आणि आज त्यातील वीज महाराष्ट्रालादेखील मिळत आहे. यांसारखे अनेक विकासाचे मुद्दे सांगत असाच विकास पुण्याचा करायचा असेल, तर भाजप-शिवसेना युतीला निवडून द्या आणि परिवर्तन करण्याची हिंमत दाखवा, असे आवाहन श्री. मोदी यांनी या वेळी केले.

 


`ऑर्कूट'वर प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्लाघ्य विडंबन ! (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २३.१.२००७)
 


प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांची `ऑर्कूट' या संकेतस्थळावरील विडंबनात्मक
 चित्रे विडंबन त्वरित न थांबवल्यास हिंदूंच्या प्रक्षोभास शासन जबाबदार
- हिंदु जनजागृती समिती

पुणे, १२ जानेवारी (वार्ता.) - इंटरनेटवरील `गुगल' या जगप्रसिद्ध संकेतस्थळाशी संबंधित असलेल्या `ऑर्कूट' या संकेतस्थळावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांचे अत्यंत हीन पातळीला जाऊन विडंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व विकृत `कम्युनिटी' त्वरित काढाव्यात अन्यथा हिंदूंच्या व्यक्‍त होणार्‍या स्वाभाविक प्रक्षोभास सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्ह्याचे प्रवक्‍ते श्री. सुनील घनवट यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. महेंद्र देवी, सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, `अभिनव भारत'चे श्री. विद्याधर रायरीकर, राष्ट्रभक्‍त समूहाचे श्री. दिनेश चव्हाण व हिंदु धर्माभिमानी श्री. हेमंत पारसनीस हे उपस्थित होते. श्री. घनवट पुढे म्हणाले, ``छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांचे अश्लाघ्य विडंबन करणार्‍या `ऑर्कूट'वर `सुअर शिवाजी रण्डवा राव', `लोडू शिवाजी' `चुत्तू शिवाजीराव', `रण्डवा राम सीता का गांडू आशिक' अशा विकृत नावानेच या `कम्युनिटी' उघडण्यात आल्या असून त्यांमध्ये शब्दांत वर्णन न करण्याइतक्या हीन पातळीवर शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांचे विडंबन आणि त्यांचा घोर अवमान करण्यात आला आहे.'' (हे वाचून ज्यांचे रक्‍त सळसळत नाही ते हिंदूच नव्हेत ! - संपादक) यापूर्वीही याच `ऑर्कूट'च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती श्री. वसंत डावखरे यांनी `ऑर्कूट' बंद करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. (अधिवेशनांमध्ये देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करायची नसेल, तर जनतेचे लाखो रुपये खर्च करून अधिवेशने भरवायची कशाला ? - संपादक) असे असतांना पोलिसांचे खास काढण्यात आलेले `सायबर सेल' काय करत आहे, असा संतप्‍त प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला. वरील प्रकारचे विकृत लिखाण करणारी मंडळी ही छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीरामचंद्र हे कोण होते, त्यांचे श्रेष्ठत्व काय होते, हे न जाणण्याइतपत अज्ञानी नक्कीच नसावीत. त्यामुळे वरील `कम्युनिटीं'तर्फे हे जाणूनबुजून केले असल्याचे उघड आहे, असेही श्री. घनवट यांनी शेवटी सांगितले. या सर्व `कम्युनिटीं'चा व त्यांतील मजकुराचा धर्माभिमानी हिंदूंनी तीव्र निषेध केला असून या संकेतस्थळावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

 


छत्रपती उदयनराजे भोसले म्हणे ``कलमाडींचे विचार शिवाजी महाराजांसारखे !'' (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, ७.१.२००७)

अल्पसंख्यांक मेळावा, ख्रिस्ती मेळावा यानंतर काँग्रेसचा अखेर `मराठा मेळावा'


पुणे, ६ जानेवारी (वार्ता.) - काँग्रेस हा व्यापक व सर्वसमावेशक पक्ष आहे. शिवाजी महाराज सर्व जातीधर्मांच्या लोकांना घेऊन पुढे जात असत. त्यांनी व्यापक विचारांनी कार्य केले. तेच कार्य टिळकांनी पुढे केले आणि तेच कार्य आज खासदार श्री. सुरेश कलमाडी करत असल्याचे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येथे व्यक्‍त केले. (निधर्मी व हिंदुद्रोही काँग्रेसच्या नेत्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवरायांची उपमा देऊन उदयनराजे यांनी शिवरायांचा घोर अपमानच केला आहे ! - संपादक) पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या मराठा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन केली. (शिवरायांचे वंशज असलेले उदयनराजे यांनी शिवरायांनी सुरू केलेले शिवशके विसरून मराठा मेळाव्यामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे शुभेच्छा देऊन मराठ्यांना अभिमान (?) वाटेल, असेच वक्‍तव्य केले आहे. - संपादक) कलमाडी यांच्यावर होणार्‍या सततच्या अमराठीच्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की, कलमाडी हे मराठाच आहेत, हे मी तुमच्या टाळया मिळवण्यासाठी नाही, तर कलमाडींच्या कर्तृत्वाने मराठा असल्याचे म्हणत आहे. `जो सर्वांना घेऊन पुढे जातो, समाजासाठी काम करतो, तो खरा मराठा. जो `दादा'गिरी करतो, तो खराटा', अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री श्री. अजित पवार यांच्यावर टीका केली. (एकमेकांवर सूडभावनेने शाब्दीक कोट्या करणारे राजकारणी देणारी निरर्थक लोकशाही नको ! - संपादक) या वेळी राज्याचे महसूलमंत्री श्री. नारायण राणे म्हणाले की, छत्रपतींचा फोटो लावला आणि दाढ्या वाढवल्या की, शिवाजी महाराजांचे गुण येत नाहीत. त्यांचे गुण आत्मसात करावे लागतात. मराठ्यांमध्ये लाचारी आणि फितुरी येता कामा नये. (राणेजी, सत्तेच्या हव्यासापोटी पक्षांतर करणार्‍यांनी हे सांगू नये. - संपादक) शिवरायांच्या वेळी घोषणा एकच असायची `हर हर महादेव'. आताही आपली घोषणा एकच असायला हवी, ती म्हणजे `सोनिया गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असे म्हणत श्री. राणेंनी भाषणाचा शेवट केला. (मराठ्यांची घोषणा ही त्या वेळीही `हर हर महादेव' ही होती आणि या पुढेही तीच रहाणार. निधर्मी काँग्रेसमध्ये गेलेल्या राणेंना या घोषणेमधील शक्‍ती काय कळणार ! - संपादक) खासदार श्री. कलमाडी या वेळी म्हणाले की, छत्रपती माझे प्रेरणास्थान आहेत. मीसुद्धा शिवाजींची प्रेरणा घेऊन काम केले आहे. काँग्रेसचा गड हा मराठ्यांमुळेच आहे. मी पुण्यातल्या क्रीडानगरीला शिवाजींचे नाव दिले. मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव शिवाजी टर्मिनस केले, पुण्यातील मराठ्यांना ४ वेळा महापौर, २ वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष, ८ वेळा पीएम्टी अध्यक्षपद दिले, असे श्री. कलमाडी या वेळी म्हणाले. (क्रीडा क्षेत्रात त्यांना मिळालेले पद हे ख्रिस्ती शाळेत गेल्यामुळे मिळाले, असे वक्‍तव्य त्यांनी नुकतेच केले होते. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. छत्रपती हे कलमाडींचे प्रेरणास्थान असते तर कलमाडींनी मुसलमान आणि ख्रिस्ती यांची मते मिळवण्यासाठी त्यांचे लांगूलचालन करणार्‍या सभा घेतल्याच नसत्या. - संपादक)

क्षणचित्रे १. प्रत्येक भाषण करणार्‍या नेत्याने शिवरायांसारखे काम करणारे कलमाडी असे कलमाडींना संबोधले.
२. मराठा मेळयाव्याच्या या कार्यक्रमातील फलकांवर `बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही घोषवाक्ये लिहिली होती.
३. अशा प्रकारचा काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच मेळावा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
४. प्रथमच काँग्रेसजणांनी `भगवे' फेटे घातले होते. नेते मंडळी आणि झेंडा वगळता हा कार्यक्रम शिवसेनेचाच असल्यासारखे वाटत होते.


`मराठा मेळावा' घेणारे कलमाडी यांची (अ)मराठी !
कलमाडी यांनी त्यांच्या भाषणामध्ये मी पुण्यात जन्मलो, शिक्षण पुण्यात झाले, मी मराठीच आहे... इत्यादी उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा केले; मात्र त्यांची बोली भाषा ही मराठी इतकी अशुद्ध व हास्यास्पद होती. त्यांना काही शब्द व वाक्ये ही वाचून म्हणावी लागत होती. `हिंदु' या शब्दाचे वावडे असणारे काँग्रेसचे नेते!
कार्यक्रमामध्ये एकाही वक्‍त्याने हिंदु या शब्दाचा उल्लेखही केला नाही. सर्वजण मराठा धर्म या नावानेच उल्लेख करत होते.

 


केरळ सरकारने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल महाराष्ट्रात संताप
 

केरळच्या साम्यवादी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व संक्षिप्‍त चरित्र यांचे मुखपृष्ठ असलेल्या `सनातन वही'वर बंदी घातल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. या तीन दिवसांतील ठळक घटनाक्रम आमच्या रविवारच्या वाचकांसाठी...


१६ जुलै २००७
छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व चरित्र असलेल्या `सनातन वही'वर केरळ सरकारने बंदी घातल्याचे व या वह्या एका शाळेत विनामूल्य वाटणारे सनातनचे हितचिंतक श्री. सुरेश भट यांना तुरुंगात डांबल्याचे वृत्त `एम्.एफ्. हुसेनला पुरस्कार : शिवरायांचा तिरस्कार' या मथळयाखाली मुख्य बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध करून ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्या `दैनिक सामना'ने या घटनेला वाचा फोडली. छत्रपतींच्या अवमानाबद्दल मुंबई येथे छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकासमोर `त्रिवेंद्रम् एक्स्प्रेस' रोखण्यासाठी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात अनेक शिवसैनिक जखमी झाले. या वेळी शिवसेनेचे आमदार श्री. दगडू सकपाळ यांच्यासह १४ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांना जामिनावर सोडले.

१७ जुलै २००७

केरळ सरकारच्या कुकृत्याबद्दल सर्वपक्षीय आमदारांनीही संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल केरळ सरकारविषयी महाराष्ट्र सरकारने निंदाव्यंजक ठराव संमत करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केली. अधिवेशनात औचित्याच्या मुद्यासाठी हा विषय उपस्थित करू, असे विरोधी पक्षनेते श्री. रामदास कदम यांनी सांगितले.

१८ जुलै २००७
शिवरायांच्या अपमानाविरुद्ध केरळ सरकारच्या विरोधात शिवसेनेने विधानसभेत निंदाव्यंजक ठराव मांडला. भाजपने या ठरावाला अनुमोदन दिले. शिवरायांच्या अपमानाविरुद्ध दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारने मात्र मौन बाळगले. या प्रकरणाची येत्या आठ दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य तो निर्णय घेईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी विधानसभेत दिले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात वितरीत झालेल्या `सनातन वही'चीही चौकशी करून त्यात काही आक्षेपार्ह वाटल्यास त्याची चौकशी करू, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व चरित्र असलेल्या `सनातन वही'वर महाराष्ट्र सरकारनेही छुपी बंदी घातल्याचे वृत्त `दैनिक आपला वार्ताहर'ला प्रसिद्ध झाले. `दैनिक सामना'ने अग्रलेख प्रसिद्ध केला, `इकडे औरंगजेब तिकडे अफझलखान ! शिवाजीराजांचे दुर्दैव !' `दैनिक आपला वार्ताहर'ने अग्रलेख प्रसिद्ध केला, `विभूतीच्या नावाचा विकृतीला पुरस्कार'

१९ जुलैपासून प्रकरणावरून महाराष्ट्रात व्यापक जनआंदोलन सुरू झाले. या आंदोलनातील संक्षिप्‍त घडामोडी
करवीर शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता उंचगाव फाटा येथे `रस्ता बंद' आंदोलन करण्यात आले.
सनातन वही'वरील बंदी उठवावी, अशी मागणी सांगली येथील धर्माभिमानी हिंदूंनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
सोलापूर येथे भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने केरळ सरकारच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.
केरळ सरकारला पाठीशी घालणारे माकपचे आमदार श्री. नरसय्या आडम यांचा सोलापूर येथे शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.

 


शिवजयंतीच्या दिवशी समर्थ रामदासस्वामी व ब्राह्मण यांचा द्वेष करणारे कोल्हापूर येथील धर्मद्रोही शिवाजी तरुण मंडळ ! (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २३.३.२००४)

या धर्मद्रोह्यांना विसरू नका !


शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीच्या सुरुवातीला बैलगाड्यांवर लावलेल्या होर्डींग्जमधून समर्थ रामदासस्वामी यांचा, तसेच ब्राह्मणांचा हेतुपुरस्सर तिरस्कार करणारी मोठी चित्रे लावून ब्राह्मणविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला होता. छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशीच त्यांच्या गुरूंचा म्हणजे समर्थ रामदासस्वामींचा अपमान करणार्‍या धर्मद्रोह्यांच्या विरोधात जागरूक हिंदुंनी पेटून उठायला हवे.

 


छत्रपती शिवरायांच्या पुतळयाची अवहेलना सनातनच्या साधिकेने थांबवली !

पुणे शहरातील सदाशिव पेठेत मी परीक्षेसाठी थांबले होते. आमच्या घराच्या समोरील श्री. प्रभाकर काटे यांच्या घराच्या गच्चीवर अडगळीत शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्या ठिकाणी त्या पुतळयाची अवहेलना होत असल्याचे माझ्या लक्षात आले. यासंबंधी प्रबोधन करण्यासाठी मी श्री. काटे यांच्या घरी गेले. श्री. प्रभाकर काटे यांना स्वत:ची ओळख सांगून शिवाजी महाराजांची अवहेलना होत असल्याची जाणीव करून दिली. डेन्मार्कमध्ये महंमद पैगंबरांचे विडंबन झाले, तर जगभरातील मुसलमान एकत्र येतात; मात्र येथे हिंदूंकडूनच हिंदूंच्या आदर्शांची अशी अवहेलना होते, हेही उदाहरणादाखल सांगितले. माझ्या बोलण्यानंतर लगेच श्री. काटे यांनी ``शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ल्यासाठी ठेवला आहे. उद्या सकाळी तो पुतळा तुम्हाला तेथे दिसणार नाही'', असे मला सांगितले. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन घरी येईपर्यंत श्री. काटे स्वत: गच्चीवर गेले व त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून उचलून घरात नेला. - कु. प्रीती उमाकांत कांबळे, सदरबझार, सातारा. (राष्ट्रपुरुषांची अवहेलना रोखण्यासाठी प्रबोधन करणारे कृतीशील साधक आणि अवहेलना रोखण्यासाठी त्वरित कृती करणारे श्री. काटे यांचे अभिनंदन ! इतरत्रच्या हिंदूंनीही यातून बोध घ्यावा. - संपादक)

 

दैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2008 - दैनिक सनातन प्रभात